
Pandharichi Vari ‘Abhangwani’ Singing an event

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व संत दर्शन मंडळ पुणे यांच्या संयुक्तपणे अभंग व भजन गायनाच्या कार्यक्रमाची सुरुवात २००२ सालापासून “पंढरीची वारी” अभंगवाणी या नावाने पुण्यात करण्यात आली.
प्रत्येक वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला विठू रायाच्या दर्शनासाठी जात असतात. अनेकांना इच्छा असून सुध्दा विठू माऊलीच्या दर्शनाला जावू शकत नाहीत अशा सर्व भक्तांना महाराष्ट्रातील महान संतांनी पंढरपूरच्या पांडुरगांबाबत रचलेल्या अभंग व भजन यांचे गायन या दोन्ही एकादशीच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांच्या करीता विनामुल्य सादरीकरण करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत दर्शन मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीराम साठे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत खाबिया यांनी संयुक्तीकरित्या करण्यास सुरुवात झाली. साल २००१-२००२ पासुन आजतागायत गेली २२ वर्षे अविरत हा कार्यक्रम सुरु आहे.
कालांतराने याच कार्यक्रमाचे नांव “विठू माऊली माझी” असे करण्यात आले. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अभंग व भजन गायनाच्या “विठू माऊली माझी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नावाजलेले प्रतिष्ठीत गायक व गायिका, निष्णात संगितवृंद आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे कायमच वैशिष्टे राहिलेले आहे.
सदर “विठू माऊली माझी” या कार्यक्रमाबाबत जास्तीची माहिती मेन मेनूमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये वर्ष २३ पासुन पुढील कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे व्हिडीओ व फोटो आपणास पाहवयास मिळतील.