Skip to content

Tree Plantation & Woods Festival

वृक्षसंवर्धन करूनिया, करू भूमातेची सेवा, सारे मिळूनिया जपू, वृक्षरूपी अमूल्य ठेवा…

दि. १ जुलै ते ७ जुलै २०२३ हा सप्ताह “वन महोत्सव” म्हणून साजरा करताना अतिशय आनंद झाला. वन महोत्सव अरण्यॠषी लालासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या वन महोत्सवात पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना मोफत विविध रोपटयांचे वाटप करण्यात आले. तसेच सह्याद्रीतील विविध देवराईत वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी वृक्षसंवर्धन या विषयावरील वृक्ष तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील वृक्षसंवर्धन करणा-या संस्थाना विविध प्रकारच्या रोपटयांचे वाटप करण्यात आले, जेणेकरून त्या संस्था रोपटयांची व्यवस्थित लागवड करून त्याची जोपासना करतील.

दिवस १ ला:‍ आमचे वृक्षमित्र सुहास घोलप यांच्याकडून वन महोत्सवासाठी १०० आंब्याची रोपे, ४० भोकर या झाडाची रोपे, ५० जांभूळ रोपे, ३ टोपल्या, उगवलेली उन्डी झाडांची रोपे, १ टोपली ताम्हण झाडांची रोपे हे सारे वनधन ताम्हीणी येथील माैजे आडगाव देवराईसाठी रवाना.. आडगाव देवराईत वृक्षारोपण..

दिवस २ रा:‍ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि २ जुलै २०२३ रोजी भोसरीतील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेत वन महोत्सवाचा दुसरा दिवस साजरा करण्यात आला. आश्रमशाळेतील परिसरात तुळस, गवती चहा, पारिजातक, आंबा, जांभळ अशा सातशे रोपांची लागवड करण्यात आली, आश्रमशाळेतील मुलांना फळ वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले होते..

दिवस ३ रा:‍ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि ३ जुलै २०२३ रोजी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गुरुकुल अनाथ मुलांच्या वसतीगृहात वन महोत्सवाचा तिसरा दिवस साजरा करण्यात आला. वसतीगृह परिसरात आंबा, जांभळ अशा शंभर रोपांची लागवड करण्यात आली, वसतिगृहातील अनाथ मुलांना फळ व संकल्पनांचा देवदूत या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिरूर तालुक्याचे युवा नेते सचिनशेठ यादव हे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले होते..

दिवस ४ :‍ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि ४ जुलै २०२३ रोजी मुळशी येथील ताम्हीणीत आकाशवाणीच्या मा संचालिका, गिर्यारोहक, लेखिका, वृक्षमित्र श्रीमती उषःप्रभा पागे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ताम्हीणीतील अनेक वृक्षमित्रांना उषःप्रभा पागे यांनी झाडांच्या विषयी मार्गदर्शन केले. ८२ व्या वर्षी सुद्धा उषःप्रभा ताईंचा जोश तरूणाईला पण लाजविणारा होता. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वृक्षारोपण व मार्गदर्शन करण्यात उषःप्रभा ताई कुठेही मागे सरल्या नाहीत. त्यांचा उत्साह पाहून प्रत्येक जण वन महोत्सवात हिरहिरीने सहभाग घेत होता. ताम्हीणीतील अनेक देवराईत आंबा, ताम्हण, जांभळ, ऐन, बेल अशी ३०० झाडे लावण्यात आली. पुणे येथील मोनाली शाह व बोटॅनिकलच्या गृपने आम्हाला झाडे लावण्यासाठी मनापासून सहकार्य केले मदत केली. यावेळेस मार्गदर्शक लालासाहेब माने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले होते..

दिवस ५ वा:‍शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि ५ जुलै २०२३  या दिवशी पुणे जिल्ह्यातील विविध शाळांच्या मध्ये झाड एक ऑक्सिजन या विषयावर मुलांच्या साठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली ता. खेड येथे वृक्षमित्र सुनिता आरूडे यांनी व्याख्यान दिले तसेच जिल्हा परिषद शाळा मांडकी ता. पुरंदर जि. पुणे येथे वृक्षमित्र वासंती दुर्गाडे यांनी व्याख्यान दिले.. दोन्ही व्याख्यानमालेत मुलांना अतिशय दर्जेदार मार्गदर्शन करण्यात आले होते या व्याख्यानमालेत बोलताना आरूडे मॅडम व दुर्गाडे मॅडम यांनी पुढील अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली ती पुढील प्रमाणे.. 

एक व्यक्ती २४ तासात २७ हजार वेळा श्वासोच्छवास घेतो. त्यासाठी त्याला दररोज ३ किलो आॕक्सिजनची आवश्यकता भासते. ती गरज पुर्ण करण्यासाठी ७ मोठ्या वृक्षांची गरज असते. ३ किलो आॕक्सिजनची बाजारातील किंमत वर्तमान  बाजारभावानुसार २१०० रु आहे. जर एक व्यक्ती आपले आयुष्य ६५ वर्षे जगला तर तो या निसर्गातून ५ कोटी रुपयाचा आॕक्सिजन मोफत वापरतो. इतक सार ऑक्सिजन आपण निसर्गाच्या माध्यमातून मोफत मिळवतो तर आपणही या निसर्गाचे काही देण लागतो म्हणून मुलांना आता पासूनच एक तरी झाड लावाव.. या कार्यक्रमाचे आयोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले होते..

दिवस ६ वा:‍ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि ६ जुलै २०२३ रोजी आगळंबे विपश्यना केंद्र, खडकवासला वन महोत्सवाचा सहावा दिवस साजरा करण्यात आला. विपश्यना केंद्राच्या परिसरात ताम्हण, ऐन, करमळ, काटे सावर अशा दोनशे रोपांची लागवड करण्यात आली, या वन महोत्सवात उज्वला फाऊंडेशनच्या वृक्ष मित्रांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे आयोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले होते..

दिवस ७ वा:‍ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि ७ जुलै २०२३ वन महोत्सवाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा भोसरी येथे साजरा करण्यात आला. सात दिवसांच्या या वन महोत्सवात सिताफळ, नारळ, वड, जांभळ, कोकम, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब, मोह, पळस, ताम्हण, ऐन, बेल अशा दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. वन महोत्सवाच्या आजच्या सांगता सोहळ्यानिमित्त भोसरी येथील MIDC परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सात दिवसाच्या महोत्सवात ज्या संस्थांनी सहभाग नोंदवला त्या संस्थांच्या सदस्यांना संकल्पनांचा देवदूत हे पुस्तक व तुळस, गवती चहाची रोप भेट देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वाढदिवसानिमित्त झाड या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आजच्या कार्यक्रमासाठी वैष्णवीताई पाटील, विनायक पाटील, रूपालीताई आल्हाट, परशुराम आल्हाट, विठ्ठल वाळुंज, सुरेश देसाई, डाॅ संपदा जोशी, जगदीश परीट, मिलींद वेल्याळ, तानाजी भोसले, उमेश पवार, मच्छिंद्र घनवट, अमोल गाडेकर, सचिन बकाले, अपर्णा मोरे, वृषाली आटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले, या कार्यक्रमात ग. दि माडगूळकर (गदिमा) यांची नात डाॅ सायली कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले होते..

निबंध स्पर्धेत सहभागी ‍विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले…

🌳 वन महोत्सव विशेष आवाहन (रोपनिर्मिती)🌳

या भागात आपण वडाची रोपे कशी तयार करायची याची सविस्तर माहिती करून घेऊया. यासाठी आपण वडाच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या लागणार आहेत. यासाठी आपण कोणतेही वडाचे झाड तोडायचे नाहीय, तर तोडलेल्या झाडांच्या फांद्या वापरायच्या आहेत.

१) सर्व छाटलेल्या फांद्या गोळा करून त्याचे एक ते दीड फुट लांबीचे कटिंग करून घ्या. शक्यतो एकसमान व सरळ फांद्याचे कटिंग असावेत. फांदीची सर्व पाने काढून टाका.

३) तुम्ही या सर्व कटिंग केलेल्या वडाच्या फांद्या बुरशीनाशक पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी (अर्धा तास) बुडवून ठेवू शकता व मातीत जाणाऱ्या कटिंगच्या भागाला कोरफड गर लावू शकता व त्या कटिंगच्या फांद्या प्लॅस्टिक पिशवीत (टाकाऊ दुधाची पिशवी, अर्धी कापलेली बाटली)  पेरू शकता.

५) तसेच कटिंग केलेल्या फांद्या या ४ ते ५ इंच जमिनीत पेरून त्या कटिंगच्या शेंड्याला तुम्ही शेणाचा गोळा लावू शकता किंवा घट्ट प्लॅस्टिक गुंडाळू शकता. (जसे आपण गुलाबाची रोपे लावताना करतो तसे) तसेच फांदीच्या वरच्या टोकाला हाताने हळद किंवा बुरशीनाशक लावा, जेणेकरून कटिंग्ज वरून खाली कुजत जाणार नाहीत.

७) या सर्व कटिंग्जना साधारण १५ ते २० दिवसात नवीन फुटवे फुटतात. काही कटिंग्जना ना वेळ ही लागू शकतो. फुटवे फुटल्यानंतर नवीन पानांची हळूहळू वाढ होऊ लागेल.

९) वड, पिंपळ, नांद्रुक ही निसर्गातील महत्वाची व डेरेदार वाढणारी झाडे आपण घरच्या घरी या शाखीय पद्धतीने तयार करू शकतो.

तर चला मिळून एकजुटीने निसर्गाची सेवा करूया. 🙏 🌱🌴🌿🌳☘️🌲 🌱🌿🌳☘️🌴🌿🌳☘️🌲🙏

en_USEnglish