Skip to content

CSR Project-II

Final Round of 1st State Level Bhajan & Abhang Competition (For Prisoners) – 13th Jun 2023 at Pune

1st State Level Bhajan & Abhang Competition (For Prisoners)

1st Jagadhguru Shree Sant Tukaram Maharaj State Level Abhang and Bhajan Competition (for Prisoner): Final Round

Maharashtra Prisons Department News | महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान (Sharad Krida va Sanskrutik Pratishthan) यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची (Sri Sant Tukaram Maharaj Bhajan and Abhang competition) महाअंतिम फेरी मंगळवार, दि. 13 जून 2023 रोजी येरवडा कारागृह (Yerwada Jail) परिसरात होणार आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र) IPS Amitabh Gupta आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया (Laxmikant Khabiya) यांनी (Pune News) पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra Prisons Department News)

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या प्रथम फेरीचा निकाल दि. १८ जानेवारी २०२३ रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्तीकरित्या वार्ताहर परिषदेत जाहीर करण्यात आला. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, तळोजा, पुणे आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे सहा संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीच्या तयारी करीता समन्वयक व संगित शिक्षक यांची नियुक्ती महाराष्ट्र कारागृह विभागाच्या परवानगीने करण्यात आली. कसुन सराव करण्यात येत होता.

त्यानंतर काही दिवसातच स्पर्धेची महाअंतिम फेरीची तारीख निश्चित होवून दि. १३ जून २०२३ रोजीची तारीख जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र कारागृह विभागाने कारागृह कर्मचारी भवन, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे महाअंतिम स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या परवानगी पत्र…

SKVSP has organized Final Round for winner of Maharashtra for 1st State Level Abhang and Bhajan Competition (for Prisoner) at staff auditorium of Yerwada Central Prison, Pune. The result of First Round was combined declared by SKVSP and Maharashtra Prison Department on 18 January 2023 by press conference. Nagpur, Nashik, Kolhapur, Taloja, Yerwada (Pune) & Amravati Central Jails have been qualified for the Final Round. After permission received from Maharashtra Prison Department music teachers and coordinators were appointed for preparation of Final Round. Rehearsal and practice has been done perfectly by each team.

Later on date of 13 June 2023 was declared for Final Round Competition. Final Round competition was held at Staff auditorium, Yerwada Central Prison, Pune.

First Winner: Kolhapur “Dnyanoba-Tukoba Trophy
Second Winner: Yerwada, Pune “Rashtrasant Tukdoji Maharaj Trophy
Third Winner: Nashik “Sant Shaikh Mohmmad Trophy

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या प्रथम फेरीचा निकाल दि. १८ जानेवारी २०२३ रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्तीकरित्या वार्ताहर परिषदेत जाहीर करण्यात आला. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, तळोजा, पुणे आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे सहा संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीच्या तयारी करीता समन्वयक व संगित शिक्षक यांची नियुक्ती महाराष्ट्र कारागृह विभागाच्या परवानगीने करण्यात आली. कसुन सराव करण्यात येत होता.

त्यानंतर काही दिवसातच स्पर्धेची महाअंतिम फेरीची तारीख निश्चित होवून दि. १३ जून २०२३ रोजीची तारीख जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र कारागृह विभागाने कारागृह कर्मचारी भवन, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे महाअंतिम स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.

स्पर्धेची महा अंतिम १३ जून कारागृह कर्मचारी भवन येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे घेण्यात आली. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, तळोजा, पुणे आणि अमरावती या संघात स्पर्धा झाली. यात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, त्यांना “ज्ञानोबा – तुकोबा महाकरंडक” व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. या स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणेचा संघ द्वीतीय क्रमांक तर नाशिक मध्यवर्ती कारागृह संघ तृतीय क्रमांक आला. यांना ही अनुक्रमे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक व प्रमाणपत्र आणि संत शेख महंमद महाकरंडक व प्रमाणपत्र देण्यात आले.

महाअंतिम फेरीचा शुभारंभ जगदगुरु संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम महाराज मोरे आणि पालखी सोहळा प्रमूख विश्वस्त अनिल महाराज मोरे तसेच अप्पर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता (महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य) स्पर्धा प्रमुख श्री. लक्ष्मीकांत खाबिया, उद्योजक राजेश सांकला, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून झाला.

या स्पर्धेचे कौतुक करुन राज्याच्या गृहविभागचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे म्हणाले, जीवनात जो पर्यंत कला क्रीडाचा समावेश होत नाही तोपर्यंत जीवनात रंगत येत नाही. स्पर्धात्मक उपक्रमनियमित घेतले जावेत ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

श्री. विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, संत विचार आणि भजनांमध्ये किती ताकद आहे याचा अनुभव स्पर्धेनिमित्ताने घेता आला. अशा स्पर्धा सातत्याने घेतल्यास गुन्हेगारीमुक्त राज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले.      

उपक्रमाचे कौतुक करुन अमिताभ गुप्ता यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, जीवनात स्पर्धा नसली तर नजरेत दिशा असावी. क्षितीजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. राजेश सांकला यांनी गणपती स्त्रोत सादर केले. हरिनामाचा गजर करुन स्पर्धेला सुरुवात झाली.

संत रचनांसह कैदी बांधवांनी रचलेल्या काही रचना सादर करुन उपस्थितांना भक्तीरसाची अनुभूती दिली. आयुष्यात नकळत काही चूका झाल्या त्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली, पण स्पर्धेमुळे जी संधी मिळाली आहे ती शब्दात वर्णन करता येण्यासारखी नाही. परमेश्वराचे नामस्मरण करीत “भले बुरे ते होवून गेले, विसरुन जाऊ या क्षणभर, जरा विसावू या वळणार” अशी मनोभावना बंदिजनांनी स्पर्धे दरम्यान व्यक्त केली.

स्पर्धेचे परीक्षण संगीततज्ञ प्रमोद रानडे, डॉ. राजेंद्र दूरकर आणि युवा गायिका सावनी सावरकर यांनी केले.

महाअंतिम फेरीतील सहा संधाचे स्पर्धेदरम्यानचे सादरीकरण…

en_USEnglish