ध्येये आणि उदिदष्टे
आपण ज्या समाजात वाढतो त्याचे आपण काही देणे लागतो याची जाणीव बाळगत केवळ समाजकारण एवढेच उददेश डोळयासमोर ठेवून ‘शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान’ पुणे जन्माला आले. आणी उददेशांच्या पुर्ततेकरीता गेली २५ वर्षे कार्यरत आहे. समाजाच्या उन्नतीकरीता खारीचा वाटा उचलत आहे. समाजाच्या स्थीतांतरातून नव नवीन गरजा व उददेश निर्माण होत असतात. आजच्या समाजावर जागतिकीकरण, आधुनिकीकरण, औद्योगीकरण, माहिती तंत्रज्ञान, इत्यादींचा प्रभाव आहे.
अ) शैक्षणिक: समाजातील गोर-गरीब वंचित, उपेक्षीत, बेघर, अनाथ मुले-मुली यांच्यासाठी, तसेच विशेषतः शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांची मुले व मुली यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम सुरु करून राबवणे, तसेच जैन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सर्व स्तरातील शैक्षणिक उपक्रम चालू करून राबविणे, यासाठी मराठी व इंग्रजी माध्यमातील तसेच बोर्ड व सी. बी. एस. ई. प्रकारच्या बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळा सुरु करणे, ज्युनिअर, सिनिअर कॉलेज, तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेदिक कॉलेज सुरु करणे, मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र, तसेच अभिमत विद्यापीठ स्थापन करणे, त्याचप्रमाणे आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, बोर्डिंग, वसतिगृह, सैनिकशाळा, कन्याशाळा, रात्रशाळा, सर्वप्रकारच्या शाळा, संगीत विद्यालय, शैक्षणिकशास्त्र विद्यालय, अध्यापक विद्यालय, मुकबधीर, अंध, अपंग, मतिमंद व विशेष विकलांग यांच्या शाळा सुरु करणे, प्रौढशिक्षण वर्ग चालवणे, तांत्रिक व औद्योगिक प्रशिक्षण वर्ग चालवणे, संगणक, टायपिंग प्रशिक्षण केंद्र, अभ्यासगृह, योग प्रशिक्षण वर्ग सुरु करणे व चालवणे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक योजना राबवणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी शिष्यवृत्तीची योजना राबवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह व महिला व बालकल्याणच्या सर्व योजना राबवणे, पाळणागृह, बालसदन, बालसंगोपन केंद्र, बालसदनिका, बाल संस्कार केंद्र, बालक आश्रम, बाल संस्कार शिबिराचे आयोजन करणे, चित्रकला, नृत्य, वादन, गायनाचे वर्ग सुरु करणे, सौंदर्यप्रसाधन प्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, अशा शैक्षणिक उपक्रमाची सोय उपलब्ध करून देवून गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे व त्यांना शिक्षणासाठी सहाय्य करणे. ‘शैक्षणिक पालक’ योजना राबवून मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांशी संपर्क साधून मदत घेणे.
ब) क्रीडा: समाजातील युवक व युवतींमध्ये देशी विदेशी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी सर्व क्रीडा प्रकारचे क्रीडांचे शिबीर आयोजित करणे, सहभाग घेणे, क्रीडांच्या स्पर्धा आयोजित करून क्रीडांगण उपलब्ध करून देणे, क्रीडापटूंना राहण्यासाठी सोय उपलब्ध करणे, क्रीडा प्रेमींना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, व्यायामशाळा सुरु करून त्यास आवश्यक असलेले सर्व साहित्य इत्यादी उपलब्ध करून देणे, निरनिराळे खेळांचे सर्व स्तरातील सामने भरवणे. युवक कल्याण अंतर्गत उपक्रम राबवणे
क)आरोग्य: जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, सहभाग घेणे, चॅरिटेबल हॉस्पिटल, शववाहिका, अँब्युलन्स यांची सोय करून देणे, एडस जनजागृती, एच. आय. व्ही./ क्षयरोग व कुष्ठरोग कर्करोग इत्यादी संसर्गित लोकांसाठी निगा व आधार केंद्र चालवणे, रक्तदान, नेत्रदान यांचे महत्व पटवून देणारे शिबीर आयोजित करणे. वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे, पॅरामेडिकल कॉलेज, रक्तपेढी आदी सुरु करणे. मुक्तीकेंद्र चालवणे, लसीकरण केंद्र चालवणे व आरोग्य विषयक सर्व योजना राबवणे .
ड) सांस्कृतिक: महापुरुषांच्या जयंत्या व स्मृती दिवस साजरे करणे, उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करणे, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, संगीत, गायन, वादन, काव्य, नाट्य, नृत्य इत्यादींच्या स्पर्धा आयोजित करणे. एड्स, दारूबंदी, हुंडाबळी यांजपासुन होणाऱ्या धोक्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करणे, प्रयत्न करणे. कौशल्य मार्गदर्शन करणे, राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करणे. साहित्य व कवी संम्मेलने भरवणे. समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये भारतीय संस्कृती विषयी अस्था निर्माण होण्याकरिता प्रयत्न करणे. त्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. तसेच अध्यात्मिक व धार्मिक वृत्ती वाढीस लागण्यासाठी अध्यात्मिक व धार्मिक केंद्र, ध्यानकेंद्र, ध्यानमंदिर, जैन मंदिर स्थापन करून त्याद्वारे समाजामध्ये सुसंस्कार निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे
इ) आपदग्रस्त: भूकंपग्रस्तांना मदत पोहचविणे व त्यांना मार्गदर्शन करणे, नैसर्गिक आपत्ती आलेल्या ठिकाणी सर्व प्रकारच्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करून मदत कार्य करणे.
ई) सामाजिक: समाजातील व विशेषतः जैन अल्पसंख्यांक समाजातील लोकांची समस्या निवारण करणे, योग्य ती सर्वप्रकारची कामे करणे, चर्चासत्र भरवणे, शिबीर आयोजित करणे, कार्यशाळा आयोजन करणे, साहित्य वाटप उपलब्ध करून देणे, समाजातील मान्यवरांचा पुरस्कार, मानपत्र देवून सन्मान करणे, सामाजिक कार्यक्रम करणे. राष्ट्रीय कार्यक्रम साजर करणे. विविध संस्थांची मदत घेणे व सर्वतोपरी साहाय्य करणे, बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून स्वयंरोजगार मार्गदर्शन करणे व त्यांच्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवून उद्योग धंदे स्थापन करण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे.
उ) संशोधन: भारतीय तत्वज्ञान, निसर्ग, विज्ञान यांचे महत्व समाजामध्ये निर्माण होण्यासाठी सर्व स्तरातील लोकांमध्ये समन्वय व सुसंवाद निर्माण करून नैतिक मूल्याच्या प्रचार, प्रसारासाठी प्रत्यक्ष कार्य करणे, जीवन विज्ञान विषयक संशोधन, शिक्षण व प्रत्यक्ष सेवा देणे. शिक्षण, आरोग्य, संस्कृती, सामाजिक न्याय व समतेचा प्रचार, प्रसारासाठी शाळा, महाविद्यालय, आयुर्वेद, योग, स्थापत्य, कला अशा भारतीय प्राचीन विद्यांचे जतन करणे, अभ्यास व संशोधन करणे व प्रचार, प्रसारासाठी व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे त्याचबरोबर प्रमाणपत्र, पदविका व पदवी अशा विविध अभ्यासक्रमांची निर्मिती करणे, राबविणे व व्यवस्थापन करणे. प्राचीन ग्रंथ, हस्तलिखिते, शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे आदींचे संग्रह करणे, जतन करणे व त्या माध्यमातून भारतीय भाषा, कला, संस्कृती, विज्ञान व समाजाचा अभ्यास, संशोधन करणे. यासाठी म्युजियम, कलादालन आदींची निर्मिती करणे व व्यवस्थापन करणे. प्रचार प्रसारासाठी मुद्रण प्रकाशनातील सर्व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करणे व प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून देणे. व्यसनमुक्त, पर्यावरणाच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्याने, प्रदर्शने, शिबिरे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजन करणे. प्रत्यक्ष केंद्र निर्माण करून सेवा देणे. शेती, आयुर्वेद, योग, पर्यावरण, कला याबाबत संशोधन, शिक्षण व प्रत्यक्ष उत्पादन करून सामान्य जनतेला या ज्ञानाचा उपयोग करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे व सेवा देणे.
ऊ) महिलाविषयक: समाजातील महिलांसाठी शिवणक्लास, विणकाम, भरतकाम, हस्तकला इत्यादी चे प्रशिक्षण देणे, तत्सम आदी कुटीर उद्योग सुरु करणे. महिला दक्षता, महिला निवारण, महिला आधार व सुधारगृह, शिशुविहार, बहुउद्देशीय महिला केंद्र चालविणे, मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह व बोर्डिंग चालू करणे. महिला व बालकल्याण योजनेच्या माध्यमातून महिला व बालकांचा विकास घडविणे, त्यांच्या सर्व योजना राबविणे. महिला बचत गट स्थापना करणे. सुवर्णजयंती योजना राबवणे, शहरी ग्रामीण रोजगार योजना राबवणे. महिलांसाठी, विधवा परितक्त्या, देवदासी महिला अप्रतिष्ठित क्षेत्रात काम करणाऱ्या, शरीरविक्रीय करणाऱ्या महिला व कामगार यांना मार्गदर्शन करून त्यांचे सबलीकरण व पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे.