Skip to content

CSR Project-II

First Jagadhguru Shree Sant Tukaram Maharaj State Level Bhajan & Abhang Competition (For Prisoners)

First Round (29 Prisons)

शरदचंद्रजी पवार साहेब, मा. अजितदादा पवार, मा. दिलीप वळसे पाटील, व मा. खा. सुप्रिया सुळे यांचे सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरीता लाभले, आपणा सर्वांचे आभार…

महाराष्ट्रातील सर्व जेलमधील बंद्यांसाठी भजन स्पर्धा घेणेबाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक, कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांनी दि.  १४ मार्च २०२० रोजी परवानगी दिली.

SKVSP and Maharashtra Prison Department has organised 1st Jagadhguru Shree Sant Tukaram Maharaj State Level Abhang and Bhajan Competition 2022 (for Prisoner) throughout Maharashtra. Keeping social purpose to inculcate the good thoughts and change in mind of prisoners. State Level abhang va Bhajan competitions were conducted in the month of May and June 2022 for first round throughout the Maharashtra. Total 29 teams have participated in the competition in first round. For the preparation and practice of competition. Total 29 sets were distributed, one set to one team.

‘शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे’ व गृहविभाग, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ” पहिली जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा-२०२२” (कारागृहातील बंदीजनासाठी) आयोजीत करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २९ संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा ही ४२ दिवस महाराष्ट्रभर शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान’ चे पदाधिकारी यांनी प्रत्येक कारागृहात जाऊन प्राथमिक फेरी पुर्ण केली. सदर स्पर्धा चांगली व दर्जेदार व्हावी म्हणून एक संगीत शिक्षक व समन्वयक प्रत्येक कारागृहास एक महिना प्रशिक्षणाठी देण्यात आला होता. प्राथमिक फेरी १९ मे ते ३० जून दरम्यान होऊन ३० जून २०२२ रोजी अमरावती येथे समाप्त झाली. आद्यात्मीक ज्ञानाच्या प्रबोधनाने बंदीजनांच्या विचारांमध्ये बदल हाेवून प्रामाणिकपणाची भावना निर्माण होवून मत परिवर्तन व्हावे, सुधारणा व्हावी हे ध्येय डोळयासमोर ठेवून सदर स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कारागृहास बंदीजनांकरीता संस्थेच्या वतीने तबला-१ (जोड), पेटी-१, पखवाज-१ व टाळ-१० व ८२ पुस्तकांचा संच व ८ x ५ ची भक्ती-शक्तीची फ्रेम इ. संच भेट देण्यात आलेला आहे. प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करुन महाअंतिम फेरीच्या नियोजनाबाबत लवकरात लवकर आयोजीत करण्यात येणार आहे. ‍

प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर जानेवारी २०२३ जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धेच्या महाअंतिम फेरीकरीता कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर व नाशिक अशा एकुण ०६ जिल्हा मध्यवर्ती कारागृहांच्या संघाची निवड करण्यात आली असून महाअंतिम फेरीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

मा. अधिक्षक, लातूर जिल्हा कारागृह वर्ग-१ यांनी पत्र पाठवून भजन संचाची मागणी केल्यानुसार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वतंत्रदिनी भजन संच व पुस्तके भेट देण्यात आली.

en_USEnglish